Sunday, 31 May 2020

 
व्यक्तिविशेष


Swpnil dada
Click Here to read in English जून २०१८ ला गो-हे बुद्रुक शाळेत रुजू झालो तेव्हापासून  शाळेत भरपुर बदल झालेत. त्याची सुरुवात झाली ती म्हणजे ‘स्टडी मॉल’ प्रोजेक्ट पासून . ‘Thinksharp Foundation’ यांच्या मदतीने आमच्या शाळेत या प्रोजेक्ट ची स्थापना झाली.  या अंतर्गत लायब्ररी , डिजिटल क्लासरूम  शाळेला देण्यात आले .
 या कामात महत्वाची भुमिका होती ती म्हणजे सिंगापूर मध्ये  राहण-या स्वप्निल दादा आणि वीणा जी ची . ते एवढ्यावर न थांबता यानंतर ही  अनेक शैक्षणिक गोष्टी , साहित्य शाळेत दिल्या आहेत .
 
   पण आज त्यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रसंग वेगळा आहे.
वेल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यातील एक छोटासा आणि अतिशय दुर्गम तालुका . पुणे जिल्हा कोरोना रेड झोन मध्ये आहे आणि वेल्हे तालुक्यातही काही रुग्ण सापडले आहेत.ही रुग्णसंख्या आणखी वाढलीच तर त्याची तयारी म्हणजे या तालुक्याचे तहसीलदार श्री. शिवाजी शिंदे यानी १०० बेड चे Covid Special हॉस्पिटल स्थापन करण्याचे ठरविले . आमच्या ग्रुप ची इच्छा होती की या कामात मदत करावी . ही गोष्ट मी स्वप्निल दादा शी बोललो. त्यानी लगेच यासाठी १५ बेड ची मदत केली.
आज ते सर्व बेड आम्ही हॉस्पिटल ला दिले.
स्वप्निल दादा परदेशात राहतात पण देशातील लोकांविषयी त्याना फार आत्मीयता आहे. Lockdown मध्ये गरजू लोकाना मदत असो किवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना विविध शैक्षणिक सुविधा देने असो या सर्व कामात त्यांचा आणि वीना जी यांचा फार सहभाग असतो.  Saturday, 30 May 2020The moon, the stars in the sky are always the subject of children's curiosity. I once told students while teaching  that there are pits on the moon. Then the children insisted that we want to see  pits on moon . We decided to bring a telescope for school children.When you decide to do something good, it is always accompanied by good people.

Ajay Dada who is currently in America. He is a friend of our Amol Dada. I told Amol Dada that we need a telescope. He told Ajay Dada about it. Then Ajay Da gave us his telescope and the children's wish to see the pits on the moon was fulfilled. This telescope is now very helpful in understanding the various concepts in the sky.
 Earlier this year, we set up a 'Turiya Lab' in the school with the idea of ​​Ajay Dada. Various activities will be implemented with the help of this lab to increase the curiosity of the children. Despite living abroad, Ajay Da is working hard to improve school facillities in our country. They make efforts from time to time to improve schools,especially in rural areas.


Along with all this, he also pays attention to social issues. 5 beds have been provided for Covid Special Hospital started in Velhe Taluka of Pune district. 
 


I have always wanted people like you to live in India.

Thursday, 28 May 2020

                            व्यक्तिविशेष 
             Click Here to read in English 

   

              श्री . विद्यानंद जी काळे
                DYSP (पोलीस)

विद्यानंद जी आणि माझी ओळख दोन वर्षांपासून ची . त्यावेळी ते मुंबई पोलीस मध्ये कार्यरत होते.  पोलीस म्हटलं की आपल्याला साहजिक आदरयुक्त भीती वाटत असते.  पण विद्यानंद जी सोबत बोलतांना आता ती भीती  हळूहळू कमी व्हायला लागली आहे . कारण त्यांच्या  गोड,विनोदी  स्वभावामुळे बोलतांना कधीच  भीती वाटत नाही .  साहेब आणि मी खूप दिवसांपासून फेसबुक वर मित्र आहोत.  आमच्या शाळेतील उपक्रमांना त्यांची नेहमीच भरभरून दाद असते.  शाळेतील काही गोष्टींना  स्वतःहून आर्थिक मदत ही त्यांनी  केली आहे.
 पण आज त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण जरा वेगळे आहे.  मी २-३ दिवसाआधी रितुपर्णा दीदी यांच्या बद्दल लेख लिहिला होता . रितुपर्णा दीदी कलकत्ता येथे नाट्य कला शाळा चालविते . कोरोना आणि Amphan  वादळ अशा दुहेरी संकटाचा सामना यावेळी या भागातील लोकांना करावा लागत आहे. या वादळामुळे रितुपर्णा दीदी चे फार मोठे नुकसान झाले. घर गेले , नाट्यकला शाळा संपूर्ण उध्वस्त झाली .  केकी जी नी फार मोलाची मदत  त्यांना केली . विद्यानंद जी सामाजिक भान असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि याची प्रचिती मला खुपवेळा  आली आहे . रितुपर्णा दीदी बद्द्ल लिहिलेला लेख जेव्हा साहेबानी वाचला त्यावेळी त्यांनी स्वतः फोन करून रितुपर्णा दीदी ला मदत पाठविली . कोरोना च्या या काळात देशसेवा करत असतांनाच अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष आहे ,यामुळेच त्यांच्याबद्दल अधिक आदर वाटतो .  खाकी वर्दीत माणूसपण जपणा-या  ख-या 'सिंघम' ना मानाचा मुजरा .  तुमच्यासारखा व्यक्ती माझे मित्र आहेत हे माझे सौभाग्य.  तुमचे आशीर्वाद नेहमीच चांगले कार्य करण्यास प्रेरणा देतात .

Monday, 25 May 2020


व्यक्तिविशेष 
 

मागील काही वर्षात खूप चांगली माणसे भेटलीत .  मग ते विदेशात राहून स्वदेशातील लोकांविषयी आपुलकी ठेवणारे स्वप्नील दादा ,अजय दादा असोत, पोलीस असतानाही सामान्याविषयी माणुसकी जपणारे विद्यानंद जी असोत किंवा स्वतःजवळ थोडे असूनही इतरांना काही देण्याची वृत्ती असणारे नरेन्द्र जी असोत. (यादी मोठी आहे ) . या सर्वांकडून मला खूप काही शिकता आले.  इतरांसाठी काही करण्याची इच्छा असल्यास कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग निघतात हे आता मला पक्के समजले आहे. 
आज मी एका व्यक्तीबद्दल लिहिणार आहे . कारण आज मला लिहावसे वाटले . माणूस त्याच्याबद्दल च लिहितो ज्याच्याविषयी प्रेम ,आदर वाटतो . 

केकी - नाव जरा वेगळे आहे आणि माणूस ही वेगळा आहे.  केकी आणि माझी ओळख तीन वर्षांपूर्वी ची . चांदर शाळेत असताना त्यांनी माझी बातमी वर्तमानपत्रात वाचली होती आणि मग कुठूनतरी माझा मोबाईल नंबर मिळवून त्यांनी मला संपर्क केला . तेव्हापासून आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत. 

मी सध्या कार्यरत असलेल्या गो-हे बु. शाळेतील विविध उपक्रमांना ते नेहमीच भरभरून दाद देतात . नुकतेच आम्ही शाळेत सुरु केलेल्या तुरीय लॅब च्या नूतनीकरणासाठी हि त्यांनी पुढाकार घेतला . 

मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात ते मला भेटायला पुण्यात आले होते . खरे म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्याकडे येतोय या विचाराने मी जरा घाबरलो होतो . पण ते आले तेव्हा एकदा पण असे वाटले नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय . ते शाळेत आले . शाळेतील सर्व उपक्रम जाणून घेतले .मागील दोन वर्षात शाळेत जे बदल झाले ते पाहून त्यांना फार छान वाटले शाळेच्या आणखी काय गरजा आहेत याची माहितीही त्यांनी  घेतली.  आणि तात्काळ मदत ही जाहीर केली . 

पण आज त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण वेगळे आहे. 
पश्चिम बंगल  मध्ये नुकतेच Amphan  वादळ येऊन गेले. आपल्याला माहितच आहे, सध्या बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वादळाचा तडाखा बसला आहे.
अनेक लोकांना आपली घरं गमवावी लागली आहेत. यापैकीच एक आमता या गावात राहणारे, रितूपर्णा बिस्वास आणि शुभेंदू भंडारी. हे दोघेही नाटक करतात.
photo cre. Amta  Parichay 
 
 "आमता परिचय" नावाची त्यांची नाट्यसंस्था आहे. 'इलादिदि' ही त्यांचं गाजलेलं नाटक.
हे दोघंही एका छोट्या गावात राहून नाटक करतात. गावागावातल्या लोकांपर्यंत त्यांनी नाटक पोहोचवलं आहे.
सध्या लॉकडाऊन नंतर ते अगदी बिकट परिस्थितीत होते. नाटक करणाऱ्या लोकांसाठी प्रयोग हे एकमेव पैसे मिळवण्याचं माध्यम ते आत्ता पूर्ण ठप्प झालं आहे.
त्यातच आता वादळाच्या तडाख्यामुळे ते अजूनच खचले आहेत.
त्यांची नाटकाची जागा हेच त्यांचं घर. बांबूने बांधलेली ही जागा अत्यंत वाईट अवस्थेत आहे, त्याबाजूची सिमेंटची त्यांची राहण्याची खोली पडली आहे. नाटकाचं काही सामान वाहून गेलं आहे तर काही खराब झालं आहे. घरात सामान नाही. जेवायचीसुध्दा मारामार आहे.
सरकार 'नाटक करणाऱ्यांकडं' लक्ष देईल अशी परिस्थिती सध्यातरी नाही.

या सगळ्या परिस्थितीत त्यांना मानसिक आधाराबरोबर आर्थिक मदतीचीही गरज होती . 

आज सकाळी च मी केकी शी याबाबात बोललो.  तात्काळ ते रितुपर्णा दीदी शी बॊलले आणि त्यांना शक्य तितकी मदत पाठविली . ही मदत खुप मोठी आहे। 

वरील तीन ओळी वाचायला फार वेळ लागला नसेल पण  ते लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी तरवळले.  कारण अशा गरजेच्या वेळी रितुपर्णा दीदी ला मिळालेली मदत आणि तिच्याशी बोलताना तिने व्यक्त केलेल्या भावना फार गोष्टी सांगून गेल्या . 
 केकी जी सारखे माणसे पृथ्वीवर भरभरून जन्म घ्यावीत हीच इच्छा व्यक्त करतो. 


टिप - माझे लिखाण चांगले नाही . सर्वच भावना इथे व्यक्त करता आल्या नाहीत.  
आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की दया

आमता परिचय बददल आणखी फोटो  

 


Tuesday, 5 May 2020
Vidyanand ji and I have known each other for two years. At that time he was working in Mumbai Police. The police said that you have a natural fear of respect. But talking to Vidyananda ji, now that fear is slowly diminishing. Because of their sweet, humorous nature, they are never afraid to speak.

Sir and I have been friends on Facebook for many days. They always appreciate our school activities. He has also helped financially with some of the school supplies.
 But the reason for writing about them today is a little different. I had written an article about Rituparna Didi 2-3 days ago. Rituparna Didi runs a drama school in Calcutta. The people of the area are facing a double whammy like Hurricane Corona and Amphan. Rituparna Didi suffered a lot due to this storm.

Vidyananda is a socially conscious personality and I have come to realize this many times. When he read the article written about Rituparna Didi, he called himself and sent help to Rituparna Didi. While serving the country during this time of Corona, he pays attention to such things, which makes him feel more respected. He is the real 'Singham' who respects humanity in a khaki uniform. It is my good fortune that people like you are my friends.


  व्यक्तिविशेष-  श्री. मिलिंद जी पगारे  २०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा...