Saturday 7 September 2024

मदतीसाठी आवाहन


 

मदतीसाठी आवाहन 

शालेय जीवनापासूनच कलेला अनन्यसाधारण महत्व आहे.  प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे जे सौंदर्य पूर्ण व कलात्‍माक तेथे मानव आकर्षीला जातो. मानवाची दृष्‍टी जेव्‍हा कलेने किंवा सौंदर्याने भरून जाते जेव्‍हा तो कलेचा भोक्‍ता होतो. 


शालेयस्‍तरावर चित्रकला आवश्‍यक :

          शालेयस्‍तरावरील कलाशिक्षण आणि विशेषतचित्रकलेचे शिक्षण हे एक विशिष्‍ट प्रकारचे शास्‍त्र आहे. बालवयापासून मुलांनाच्‍या मनावर कलेचे संस्‍कार घडविणे म्‍हणजे ख-या अर्थाने चांगले सुसंस्‍कृत नागरिक बनविण्‍याचा विचार करणे हा या शास्त्राचा मूलभूत आधार आहे. सामान्‍य नागरिकांच्‍या मते मुलोच्‍य पुढील अयुष्‍यात ज्‍यांना डॉक्‍टरइंजिनिअरइत्‍यादी व्‍हायचे आहे त्‍यांना या विषयाचा फारसा उपयोग नाही. हा गैरसमज आहे. खरी वस्‍तुस्थिती अशी आहे की चित्रकला हा विषय नसुन ती एक शिस्‍त आहे. की ज्‍या मधून इतर विषय ही योग्‍य प्रकारे शिकता येतात. ज्‍या विद्यार्थ्‍यास सुंदर लयबध्‍दगोष्‍टी पाहून आनंद होतो त्‍याची संवेदशक्ती सचेत होते व चांगल्‍या कलात्‍मक गोष्‍टी स्‍वतबनविण्‍यास प्रवृत होतो. असा विद्यार्थी आपल्‍या आयुष्‍यास सुत्रबध्द आकार देतो. कोणत्‍याही क्षेत्रात तो कमी पडत नाही. त्‍याला जीवन कलारसिकतेने जगण्‍याची सवय लागते ज्‍यामुळे तो त्‍याच्‍या जीवनातील कठीण परिस्थितीतही त्‍याच्‍या मनाचा तोल जावून देत नाही.

    लहानपानापासून कलेचे संस्‍कार मनावर घडल्‍यास व्‍यक्तिमत्‍त्‍वाला एक गहिरेपणा प्राप्‍त होतो. म्‍हणून शालेय जीवनात चित्रकलेचा अंर्तभाव असणे क्रमप्राप्‍तच ठरते. जगातील अनेक शिक्षणतंज्‍ज्ञांना त्‍याची प्रखरतेची जाणीव झाली आहे. वैफल्‍यक्रौर्यन्यूनगंडअसहाय्यताअनेक प्रकारच्‍या मानसिक विकृती या आजच्‍या समाजातील प्रकर्षाने जाणवणा-या प्रवृती नाहीशा करावयाच्‍या असतील तर जीवनाला क्रियाशीलतेचे वळण लावणे आवश्‍यक आहेहे वळण लावण्‍यासाठी साधा सरळ मार्ग म्‍हणजे मुलांना सुंदर गो‍ष्‍टीत रमण्‍याची संधी देणे. अशी संधी कलेद्वारे सहज शक्‍य होते. या पार्श्‍वभूमिवर विचार करताशाळेत चित्रकला शिक्षणाचे महत्‍व आहे. याची कल्‍पना येईल.

    कला शिक्षणाचा मूळ हेतू फक्त मनाला वळण लावणे नसून संपूर्ण जीवनाला नीट वळण लावणे आहे.

 लहान मुलाच्‍या मनात दडून बसलेल्‍या भाव-भावनासुप्‍त निर्माणक्षम शक्‍ती यांना वाव देवून त्‍यांच्‍या व्‍यक्त्मित्‍त्‍वाचा विकास करणे हे शालेय कलाशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्‍ट आहे. हे मानावेच लागेल.

मार्च २०२४ पासून शाळेत चित्रकलेचा विशेष वर्ग सुरू केला आहे. चित्रकलेत पारंगत आणि सर जे.जे. महाविद्यालयातून  Bachelor Of Fine Arts पदवी प्राप्त श्री.संदिप डांगे यांच्या पुढाकाराने हा वर्ग सुरू आहे. दर रविवारी  सकाळी ९ .३० ते १२ .३० वाजता हा चित्रकला वर्ग असतो. चित्रकला,रंगकला बेसिक पासून प्रोफेशनल लेवल पर्यंत मुलांना घडवण्याचा आमचा मानस आहे.

पण चित्रकला शिकण्याचा प्रवास वाटला तेवढा सोप्पा नाही, याची प्रचिती साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्यावर आली. साहित्यांची किंमत पाहिल्या आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोऱ्हे बुद्रुक  येथील विद्यार्थ्याना हे सर्व परवडणारे नाही याची खात्री झाली.

पण ,चित्रकला शिकण्याचा हा प्रवास थांबवायचा नाही ,असे मनोमन ठरवले आहे. त्यामुळे हा खटाटोप. ३५-४०  मुलांच्या  वर्गासाठी सर्व साहित्य आणि इतर बाबींवर जवळपास १,००,०००-/ रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.  आजपर्यंतचा खर्च लोकवर्गणीतूच भागवला आहे. परंतू, आता खर्च मोठा आहे . या पत्राद्वारे आपणांस विनंती आहे कि, या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आपणांस जेवढी होईल तेवढी मदत करावी.

पुढील टप्प्यासाठी प्रति विद्यार्थी ७५० रू .  याप्रमाणे खर्च अपेक्षित आहे. आपण शक्य तितक्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलू शकता.

बँक खाते माहिती - 

नाव- Mukhyadhyapak Jilha Parishad Prathmik Shala Gorhe Bk

IFSC- HDFCOPDCCB

AC No.- 061001600000332

Branch- Khadakwasla

Bank Name- PDCC Pune




Saturday 3 August 2024



                                  

 

आमच्या शाळेतील श्रावणी ही इतर मुलांसारखी लगेच प्रतिसाद देत नाही. त्याचे कारण म्हणजे तिला असलेला श्रावणदोष  आणि त्याचमुळे तिला वाचादोष सुद्धा आहे. ती माझ्या वर्गात नाही पण कधीमधी माझ्या वर्गात बसली की मला तिची हि समस्या फार भयंकर वाटायची . शिक्षक जे बोलते तेच तिला ऐकू येत नसेल तर वर्गात बसून तिला काही फायदा होणार नाही हे मला नेहमी वाटायचे. श्रवणयंत्र हे त्यासाठी एकमेव उपाय आहे हे मला अनेकांनी सांगितले. तिला तत्काळ श्रवणयंत्र बसवावे लागेल हे डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितले आणिचांगले यंत्र पाहिजे असल्यास  दोन्ही कानांच्या मशीन साठी जवळपास  50,000 रूपये मोजावे लागतील हेही सांगितले.
 
अनेक दिवसांपासून मी सद्गुरू सेवा Foundation यांच्या संपर्कात आहो. आमचे मित्र श्री.सचिन म्हसे यांनी अनेकदा शाळेसाठी आणि मुलांसाठी मदत केली आहे. 
श्रावणी चा विषय म्हसे सरांना सांगितला आणि मग ते मदत करायला तयार झाले. अनेक doner च्या मदतीने आज श्रावणी ला मस्त पैकी  ४६,०००  रूपयांचे श्रवणयंत्र मिळाले. 

ती ऐकेल आणि शिकेल एवढंच समाधान .







 

Sunday 9 June 2024

 'धनु' ....... अशी हाक मारल्यावर 'हो सर ' अशी साद आता ऐकायला मिळणार नाही.    धनश्री म्हणजे धनु शाळा सोडून गेली. शाळा सुरू झाल्यावर ती वर्गात  नसेल ही भावनाच फार वेदना देणारी आहे. पालकांचे कामासाठी होणारे स्थलांतर आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून घडवलेली मुले शाळा सोडून जाणे  ही समस्या माझ्यासारख्या शिक्षकांना फार अवघड स्थितीत टाकते.  धनु अनेक चांगल्या गुणांनी समृद्ध असलेली मुलगी. हुशार,चाणाक्ष, प्रेमळ , काहीतरी मोठे करण्याची आकांक्षा अशा कितीतरी गुणांनी ती परिपूर्ण आहे. आम्ही कितीतरी गोष्टी हसत-खेळत शिकलो. 

शिक्षक शाळेत अनेक विद्यार्थी घडवत असतो पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना बघून शिक्षक स्वतः घडत असतो. धनश्री त्यापैकीच एक. अभ्यासात ,उपक्रमांत ,स्पर्धांत अनेक वेळी तीने शाळेचे नाव केले आहे. मी एखाद्या चुकीवर तिला रागावलो  तरी क्षणात जवळ येणारी धनु आता माझ्या  जवळ नाही.

तिच्यामुळे अनेकदा मी ,शाळेने अभिमानस्पद क्षण अनुभवले. विज्ञान प्रदर्शनात अगदी  वेळेवर तिने दिलेले भाषण असो की बालेवाडी येथील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत तिने तेथील Science Talk येथे विचारलेला प्रश्न आणि त्यासाठी तिला आणि शाळेला मिळालेली दाद मी कधीच विसरू शकणार नाही.  

आमच्या शाळेत सुरु असलेल्या 'माझा गाव माझी बातमी' या channel ची ती प्रमुख घटक . आता ती नाही तर यावर्षी शून्यातून सर्व सुरु करावे लागेल. तिच्यासाठी मी अनेक गोष्टी ठरवल्या होत्या , पण .... 

शाळेतील अशी एकही गोष्ट नाही ज्यात तिचा सहभाग नसेल. प्रत्येक कामात  ती पुढे होती. माझ्याही पुढे. ती होती तर मलाही चार हात असल्यासारखे वाटत होते. तिने माझी फार काळजी घेतली. 

ती शाळेत नसली तरी तिचा भास मला प्रत्येक ठिकाणी होईल. वर्गात शिकवतांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच आले नाही तेव्हा ती आठवेल.

आमच्या शाळेचा ती भक्कम पाया होती. आमच्या प्रयोगशाळेतील ती महत्वाचा भाग होती. ती माझा उजवा हात होती.  ती जावू नये असे मनापासून वाटत होते पण मी तिला थांबवू शकलो नाही. मी जितके तिला प्रेम दिले त्यापेक्षा कितीतरी पटीने तिने मला दिले.  निरोप देतांना माझ्या छातीशी कवटाळलेल्या धनुला सोडूच नये असे वाटत होते. पण ती गेली, अनेक  आठवणी ठेवून.

तु माझ्या मनाच्या सर्वात सुंदर कप्प्यात सदैव राहशील,धने.

 

खूप प्रेम











Saturday 4 May 2024

शहरी भागातील शालेय मुलांना समर कॅम्प ही गोष्टी फार नवी नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की शहरी भागातील पालकांची लगबग सुरू होते ती एखादा समर कॅम्प बघून त्यांच्या पाल्यांना तिथे पाठवण्याचा . त्यासाठी मोठा खर्च करायलाही ते मागे-पुढे बघत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांना यासारख्या गोष्टीं अनोळखीच असतात. त्यामागे अनेक करणे आहेत.

मला नेहमी वाटते कि नव्या अनुभवांचे, नव्या गोष्टींचे ताट विद्यार्थ्यांपुढे मांडणे हेच एका शिक्षकाचे काम असते. पोरांनी त्यातले त्यांना जे लागते ते घ्यावे,मनमुराद खावे आणि काही शिदोरी म्हणून बांधून न्यावे. असेच काहीसे करण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षांपासून उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. एकही रुपया शुल्क न आकारता लोकवर्गणीतून या संपूर्ण उन्हाळी शिबिराचा खर्च भागविला जातो.

या वर्षीही असाच समर कॅम्प शाळेत सुरू आहे. वेळ मिळाल्यास नक्की भेट द्या.




Sunday 16 July 2023

वृक्षवल्ली-
२००० देशी रोप निर्मितीच्या दिशेने-
मागील वर्षी सुरु केलेल्या या उपक्रमात आज २०० पेक्षा जास्त रोपांसाठी बिया रुजवण्यात आल्या. या कामात पोरांचाच उत्साह जास्त असतो. आज शाळेतील रोपवाटिकेत करंज , बोर,अर्जुन ,आंबा,सीताफळ,बहावा,चिंच,शेवगा,सीताफळ,जांभूळ,भेंडी,पारिजात, इत्यादी झाडांच्या बिया रुजवण्यात रुजवल्या.
आमचे मित्र अमित जी गद्रे नेहमीच या कामात शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करतात. आजही ते आवर्जून शाळेत आले . त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.


मदतीसाठी आवाहन

  मदतीसाठी आवाहन  शालेय जीवनापासूनच कलेला   अनन्यसाधारण महत्व आहे.   प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे ...