कांचन ताई वर्षातून एक-दोन दा शाळेत येते ,मुलांना भरपूर खावू आणते ,मेहंदी या कलेविषयी अनेक गोष्टी सांगते. गौरी तेव्हा पाचवीला होती जेव्हा ताई शाळेत तिच्या अनेक विद्यार्थिनीसोबत आली होती. मुलींसाठी मेहंदी चा एक मार्गदर्शन वर्ग तिने त्यावेळी घेतला होता. छोट्या गौरीने सुंदर मेहंदी त्यावेळी रेखाटली होती. कांचन ताई ला त्यावेळी गौरी ने काढलेली मेहंदी आवडली होती. मी त्यावेळी ताई ला सहज म्हटलं होतं , "ताई,हिला तुम्ही आणखी शिकवा." त्यावेळी ताई ने ही शब्द दिला होता की गौरी ला थोडं मोठं होऊ द्या,तिला नक्की बोलवील. काल तो दिवस आला. गौरी कांचन ताईच्या मेहंदी क्लास जायला लागली आहे. तिला तिथे बघून मला प्रचंड आनंद झाला. आपल्या शिक्षणाबरोबर तिने एखादी अशी कला जोपासावी आणि वाढवावी अशी मला तिच्याकडून अपेक्षा आहे.
कांचन ताई ही पुण्यातील प्रसिद्ध मेहंदी artist आहे. पण त्यापेक्षाही ती सुंदर मनाची आणि समाजशील व्यक्ती आहे. अनेक वर्षापासून मी बघतो आहे की , ती मेहंदी क्लासेस सुद्धा घेते आणि त्या मधून शिकून बाहेर पडणाऱ्या मुली स्वतःच्या पायावर उभे होतात. मी त्या मुलींचे मनोगत अनेकदा पाहिलेले ,ऐकलेले आहे. त्यांच्या मनात कांचन ताई बद्दल नितांत आदर आणि प्रेम असते.
ताई, तुम्हाला खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा.
No comments:
Post a Comment