अमोलचा दादा चा प्रेरणादायी वाढदिवस...
आजचा दिवस अमोलसाठी आणि माझ्यासाठीही विशेष होता. त्याचा वाढदिवस फक्त आनंद आणि गोडधोड यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एक समाजोपयोगी आणि प्रेरणादायी क्षण ठरला. वायफळ खर्च टाळून, तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा त्याने घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.आज अमोलने माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. काल रात्रीच अमोल आणि माझा call झाला .. वाढदिवस आहे ,शाळेत येतोय ,मुलांना काय आणू ? आणि रात्रीच सर्व नियोजन करून तो आज सहपरिवार शाळेत आला . मुलांसाठी नोटबुक्स , वह्या,पेन,पेन्सिली अशा अनेक गोष्टीसोबतच भरपूर खावू मुलांना आज मिळणार होता . आज अमोल चा वाढदिवस शाळेत साजरा झाला. साजऱ्या केलेल्या प्रत्येक क्षणात अमोलचा हेतू स्पष्ट जाणवत होता – आपल्या आनंदात दुसऱ्यांना सामावून घेणे आणि समाजाला काहीतरी चांगले देणे.शाळेतील मुलांनीही खूप उत्साहाने हा क्षण साजरा केला. अमोलने त्यांना केवळ वस्तू दिल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना शिकण्याची प्रेरणा दिली. मुलांचे चेहरे हसरे झाले आणि त्या आनंदात खऱ्या वाढदिवसाचा अर्थ दिसून आला.अमोलचा हा उपक्रम फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर इतरांसाठीही एक चांगला संदेश आहे – आपण आपला आनंद इतरांसोबत शेअर केल्यावर तो अधिक वाढतो. वायफळ खर्च न करता आपण खरोखर गरजूंना मदत करू शकतो आणि आपल्या आनंदाच्या क्षणांना अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.त्याच्या या कृतीने मला खूप प्रेरणा दिली आहे. तुझ्या या प्रेरणादायी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा, अमोल! जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment