Sunday, 15 June 2025

 स~~~~~र...

तिचा हा आवाज मी लाखांच्या गर्दीतही ओळखील.
धनु... माझी प्रिय विद्यार्थिनी. मागच्या वर्षी बरोबर २१ मे ला ती शाळा सोडून मुंबईला गेली.. काय सांगू कसं वाटत होतं ! लेक लग्न होवून सासरी गेली अशी अवस्था त्यावेळी माझी होती.
आज कुटुंबासोबत मुंबई ला गेलो होतो. आदल्या रात्री तिला मेसेज केला. ती मला भेटायला येईलच अशी खात्री होती.
मला पाहून हसत हसत गळ्यात पडलेली धनु आणि मी कधी रडायला लागलो , कळलंच नाही. शाळेमध्ये आम्ही केलेली धम्माल,वर्गातील मजेशीर प्रसंग यांवर चर्चा करतांना काल पोटभर हसलो.
तिच्या भविष्यातील योजना ऐकून मीही थोडा वेळ शांत झालो. दरवेळी वाटते किती प्रगल्भ झाली ती.
शिक्षक म्हणून मी स्वतःला फार समृद्ध समजतो , तिच्यासारखी विद्यार्थिनी मला लाभली. तिच्यासारखा एक तरी विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रत्येक शिक्षकाला लाभो.


No comments:

Post a Comment

  स~~~~~र... तिचा हा आवाज मी लाखांच्या गर्दीतही ओळखील. धनु... माझी प्रिय विद्यार्थिनी. मागच्या वर्षी बरोबर २१ मे ला ती शाळा सोडून मुंबईला गे...