आमच्या शाळेतील श्रावणी ही इतर मुलांसारखी लगेच प्रतिसाद देत नाही. त्याचे कारण म्हणजे तिला असलेला श्रावणदोष आणि त्याचमुळे तिला वाचादोष सुद्धा आहे. ती माझ्या वर्गात नाही पण कधीमधी माझ्या वर्गात बसली की मला तिची हि समस्या फार भयंकर वाटायची . शिक्षक जे बोलते तेच तिला ऐकू येत नसेल तर वर्गात बसून तिला काही फायदा होणार नाही हे मला नेहमी वाटायचे. श्रवणयंत्र हे त्यासाठी एकमेव उपाय आहे हे मला अनेकांनी सांगितले. तिला तत्काळ श्रवणयंत्र बसवावे लागेल हे डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितले आणिचांगले यंत्र पाहिजे असल्यास दोन्ही कानांच्या मशीन साठी जवळपास 50,000 रूपये मोजावे लागतील हेही सांगितले.
अनेक दिवसांपासून मी सद्गुरू सेवा Foundation यांच्या संपर्कात आहो. आमचे मित्र श्री.सचिन म्हसे यांनी अनेकदा शाळेसाठी आणि मुलांसाठी मदत केली आहे.
श्रावणी चा विषय म्हसे सरांना सांगितला आणि मग ते मदत करायला तयार झाले. अनेक doner च्या मदतीने आज श्रावणी ला मस्त पैकी ४६,००० रूपयांचे श्रवणयंत्र मिळाले.
ती ऐकेल आणि शिकेल एवढंच समाधान .
No comments:
Post a Comment