Sunday, 31 May 2020

 
व्यक्तिविशेष


Swpnil dada
Click Here to read in English 



जून २०१८ ला गो-हे बुद्रुक शाळेत रुजू झालो तेव्हापासून  शाळेत भरपुर बदल झालेत. त्याची सुरुवात झाली ती म्हणजे ‘स्टडी मॉल’ प्रोजेक्ट पासून . ‘Thinksharp Foundation’ यांच्या मदतीने आमच्या शाळेत या प्रोजेक्ट ची स्थापना झाली.  या अंतर्गत लायब्ररी , डिजिटल क्लासरूम  शाळेला देण्यात आले .
 या कामात महत्वाची भुमिका होती ती म्हणजे सिंगापूर मध्ये  राहण-या स्वप्निल दादा आणि वीणा जी ची . ते एवढ्यावर न थांबता यानंतर ही  अनेक शैक्षणिक गोष्टी , साहित्य शाळेत दिल्या आहेत .
 
   पण आज त्यांच्याबद्दल लिहिण्याचा प्रसंग वेगळा आहे.
वेल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यातील एक छोटासा आणि अतिशय दुर्गम तालुका . पुणे जिल्हा कोरोना रेड झोन मध्ये आहे आणि वेल्हे तालुक्यातही काही रुग्ण सापडले आहेत.ही रुग्णसंख्या आणखी वाढलीच तर त्याची तयारी म्हणजे या तालुक्याचे तहसीलदार श्री. शिवाजी शिंदे यानी १०० बेड चे Covid Special हॉस्पिटल स्थापन करण्याचे ठरविले . आमच्या ग्रुप ची इच्छा होती की या कामात मदत करावी . ही गोष्ट मी स्वप्निल दादा शी बोललो. त्यानी लगेच यासाठी १५ बेड ची मदत केली.
आज ते सर्व बेड आम्ही हॉस्पिटल ला दिले.
स्वप्निल दादा परदेशात राहतात पण देशातील लोकांविषयी त्याना फार आत्मीयता आहे. Lockdown मध्ये गरजू लोकाना मदत असो किवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना विविध शैक्षणिक सुविधा देने असो या सर्व कामात त्यांचा आणि वीना जी यांचा फार सहभाग असतो.  











No comments:

Post a Comment

  Project- कणाद :  Science Exibition Platform कणाद हा तुरिय लॅबचा प्रमुख प्रकल्प आहे, जो मुलांमध्ये सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्य...