Monday 1 June 2020


व्यक्तिविशेष
अजय दादा 

चंद्र ,आकाशातले तारे हा नेहमीच मुलांच्या कुतूहलाचा विषय असतो.  मी एकदा मुलांना शिकवितांना सहज बोलून गेलो की चंद्रावर खड्डे आहेत . मग मुलांनी हट्ट च धरला कि  आम्हाला ते खड्डे बघायचेच .  आम्ही ठरविले की शाळेतील मुलांसाठी टेलिस्कोप आणायचा . 
एखादी चांगली गोष्ट करायची ठरविल्यास त्यास नेहमीच चांगल्या लोकांची साथ लाभते . 
अजय दादा जे सध्या अमेरिकेत असतात . ते आमच्या अमोल दादा चे मित्र . आम्हाला टेलिस्कोप ची गरज आहे हि गोष्ट मी अमोल दादा ला बोललो होतो .  त्यांनी अजय दादाला याबाबत सांगितले . मग काय अजय दा नी आम्हाला त्यांच्याकडील टेलिस्कोप दिला आणि मुलांची चंद्रावरील खड्डे पाहण्याची इच्छा पूर्ण झाली . या टेलिस्कोप द्वारे आकाशातील विविध संकल्पना समजविण्यास आता फार मदत होते. 

 या वर्षाच्या सुरूवातीला च अजय दादा च्या संकल्पनेतुन आम्ही शाळेत 'तुरीय लॅब' ची स्थापना केली. मुलांची जिज्ञासा वाढावी यासाठी या लॅब च्या साहाय्याने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 


परदेशात राहूनही अजय दा आपल्या देशातील शालेय बाबींमध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करतात . 
 या सर्वांसोबतच ते सामाजिक बाबीतही लक्ष घालतात . पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सुरु झालेल्या कोविड स्पेशल हॉस्पिटल साठी ५ बेड ची मदत केली आहे. 


तुमच्या सारखे माणसे भारतात राहावी असे नेहमीच मला वाटते .

No comments:

Post a Comment