ज्ञान उड्या मारत नाही ते पायरीपायरीने पु्ढे जाते.Knowledge does not leap it progresses gradually.

                            व्यक्तिविशेष 
             Click Here to read in English 

   

              श्री . विद्यानंद जी काळे
                DYSP (पोलीस)

विद्यानंद जी आणि माझी ओळख दोन वर्षांपासून ची . त्यावेळी ते मुंबई पोलीस मध्ये कार्यरत होते.  पोलीस म्हटलं की आपल्याला साहजिक आदरयुक्त भीती वाटत असते.  पण विद्यानंद जी सोबत बोलतांना आता ती भीती  हळूहळू कमी व्हायला लागली आहे . कारण त्यांच्या  गोड,विनोदी  स्वभावामुळे बोलतांना कधीच  भीती वाटत नाही .  साहेब आणि मी खूप दिवसांपासून फेसबुक वर मित्र आहोत.  आमच्या शाळेतील उपक्रमांना त्यांची नेहमीच भरभरून दाद असते.  शाळेतील काही गोष्टींना  स्वतःहून आर्थिक मदत ही त्यांनी  केली आहे.
 पण आज त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण जरा वेगळे आहे.  मी २-३ दिवसाआधी रितुपर्णा दीदी यांच्या बद्दल लेख लिहिला होता . रितुपर्णा दीदी कलकत्ता येथे नाट्य कला शाळा चालविते . कोरोना आणि Amphan  वादळ अशा दुहेरी संकटाचा सामना यावेळी या भागातील लोकांना करावा लागत आहे. या वादळामुळे रितुपर्णा दीदी चे फार मोठे नुकसान झाले. घर गेले , नाट्यकला शाळा संपूर्ण उध्वस्त झाली .  केकी जी नी फार मोलाची मदत  त्यांना केली . विद्यानंद जी सामाजिक भान असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि याची प्रचिती मला खुपवेळा  आली आहे . रितुपर्णा दीदी बद्द्ल लिहिलेला लेख जेव्हा साहेबानी वाचला त्यावेळी त्यांनी स्वतः फोन करून रितुपर्णा दीदी ला मदत पाठविली . कोरोना च्या या काळात देशसेवा करत असतांनाच अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष आहे ,यामुळेच त्यांच्याबद्दल अधिक आदर वाटतो .  खाकी वर्दीत माणूसपण जपणा-या  ख-या 'सिंघम' ना मानाचा मुजरा .  तुमच्यासारखा व्यक्ती माझे मित्र आहेत हे माझे सौभाग्य.  तुमचे आशीर्वाद नेहमीच चांगले कार्य करण्यास प्रेरणा देतात .

No comments:

Post a Comment