Thursday, 26 December 2019
Monday, 23 December 2019
आज अमेरिकेहून फोन आला . श्री अजय जी वालगुडे यांचा . अजयची सासवड चे पण ते सध्या अमेरिकेत काम करतात . तिकडे असूनही त्यांना देशातील शालेय मुलांविषयी तळमळ आहे . मागच्याच आठवड्यात त्यांना मला टेलिस्कोप दिला . शाळेतील मुलांना आकाशसफर करायला याचा नक्कीच फायदा होईल . अजयजी एका छान प्रोजेक्टवर काम करत आहेत आणि त्या अंतर्गत त्यांनी Turiya Lab स्थापन करण्यासाठी काम सुरू केले आहे . मुलांना नवीन तंतज्ञान शिकता यावे आणि त्याच वापर आपल्या समाजासाठी व्हावा हा या project मागील हेतू . या project मध्ये विद्यार्थी IOT platform बद्दल शिकतील , coding जाणून घेतील आणि त्याचा वापर नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करतील यात शंका नाही .
या प्रोजेक्ट मध्ये मला पण सहभागी करुन घेतल्याबददल खुप धन्यवाद सर..
Friday, 13 December 2019
Tested..Ok
Today's night,We assembled Telescope at our school & my students are all ready to start friendship with stars & planets.
Thank you Gaurav Babar Dada for your nice cooperation .
Sunday, 8 December 2019
मागील काही वर्षात खुप चांगले मित्र मिळाले. त्यांपैकी च म्हणजे अमोल सर,मिलिंद सर ,प्रसाद सर आणि सुमीत सर. फेसबुक वर झालेली ओळख आणि मग समविचाराने जमलेली मैत्री यामुळे आजपर्यंत समाजपयोगी कार्य यांच्यामुळे घडत गेले. अमोल सर स्वतः फोटोग्राफर आहेत ,एकदम व्यस्त जीवनशैलीतून हि ते समाजातील तळागळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपडत असतात .आणि त्यांना मोलाची साथ लाभते ती त्यांच्या ग्रुप मधील सर्व मित्रांची . प्रसिद्धी नको ,काही नको आपले काम करत राहायचे हे वाक्य ते नेहमी बोलत राहतात .
मागील महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी टेलिस्कोप घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यासाठी लागणार निधी मी 'Group Fund Raising' या संकल्पनेनुसार जमा करण्याचे ठरविले होते . ही कल्पना खूप दिवसांपासून मनात होती पण त्याला गती मिळाली ती श्री नरेंद्र जी उमाळे यांच्यामुळे . त्यांनी असाच एक उपक्रम राबवून आमच्या शाळेसाठी निधी उभा केला होता .
Group Fund Raising' संकल्पनेनुसार काही ठराविक मित्रांना तसे मेसेजेस पाठविले आणि त्यांचेही चांगले रिस्पॉन्स आले. विद्यानंद जी काळे जे DYSP पदावर पोलीस खात्यावर सेवेत आहेत ,विशाल महाडकर (मुंबई, movie डायरेक्टर ), अमरजी रेणुसे (HP पेट्रोल पंप मालक ) या सर्वांनी त्यांची मदत पाठविली.
पण या सर्व गोष्टी घडत असताना अमोल सरांची धडपड माझ्यापेक्षाही जोरात चालली होती.
आज रात्रीचे १२. ३० वाजले होते मी मस्त झोपलो होतो आणि दोन महानुभाव माझ्या घरी पोहचले ,अमोल सर आणि मिलिंद सर . त्यांच्या हातात टेलिस्कोप होता. खरं तर पहिल्यांदा शॉक च झालो. टेलिस्कोप देवून ते निघूनही गेले.
अमोल सर ,मिलिंद सर आणि टीम ...खरंच तुम्ही ग्रेट आहात . खूप काही शिकतोय तुमच्याकडून .
![]() |
खूप खूप धन्यवाद शिरीष जी आणि दर्शना मॅडम .
https://www.rajnisir.in/2019/12/blog-post8Shirishji.html
Thursday, 5 December 2019
शिक्षक म्हणून हे माझे दहावे वर्ष आहे. विज्ञान आवडता विषय असल्याने खूप वाटायचे कि शालेय विज्ञान प्रदर्शनात आपण हि सहभागी व्हावे ; पण काही कारणास्तव तसा प्रसंग आला नाही . मागील वर्षी गो-हे बु. शाळेत बदली झाली आणि यावर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला . मनातील कल्पना मुलांकडून जाणून घेतल्या कि आपल्याला काम करण्याची दिशा मिळते . 'शाश्वत कृषी पद्धती आणि संसाधन व्यवस्थापन ' या विषयावर आधारित एक प्रोजेक्ट आमच्या शाळेतर्फे प्रदर्शनात मांडण्यात आला, तो सर्वांना आवडला ,खूप चांगले फीडबॅक हि मिळाले आणि हो आमचा प्रोजेक्ट या प्रदर्शनात पहिला ठरला .
Subscribe to:
Posts (Atom)
व्यक्तिविशेष- श्री. मिलिंद जी पगारे २०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा...
-
चांदर शाळेवरुन बदली झाली ..... पानवलेल्या डोळयांनी निरोप घेतो ... It has been eight years since I am working in Chand...
-
When you even think to do better for Society & the Peoples...many factors come into play for helping your cause...Same think happened h...