मागील काही वर्षात खुप चांगले मित्र मिळाले. त्यांपैकी च म्हणजे अमोल सर,मिलिंद सर ,प्रसाद सर आणि सुमीत सर. फेसबुक वर झालेली ओळख आणि मग समविचाराने जमलेली मैत्री यामुळे आजपर्यंत समाजपयोगी कार्य यांच्यामुळे घडत गेले. अमोल सर स्वतः फोटोग्राफर आहेत ,एकदम व्यस्त जीवनशैलीतून हि ते समाजातील तळागळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपडत असतात .आणि त्यांना मोलाची साथ लाभते ती त्यांच्या ग्रुप मधील सर्व मित्रांची . प्रसिद्धी नको ,काही नको आपले काम करत राहायचे हे वाक्य ते नेहमी बोलत राहतात .
मागील महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी टेलिस्कोप घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यासाठी लागणार निधी मी 'Group Fund Raising' या संकल्पनेनुसार जमा करण्याचे ठरविले होते . ही कल्पना खूप दिवसांपासून मनात होती पण त्याला गती मिळाली ती श्री नरेंद्र जी उमाळे यांच्यामुळे . त्यांनी असाच एक उपक्रम राबवून आमच्या शाळेसाठी निधी उभा केला होता .
Group Fund Raising' संकल्पनेनुसार काही ठराविक मित्रांना तसे मेसेजेस पाठविले आणि त्यांचेही चांगले रिस्पॉन्स आले. विद्यानंद जी काळे जे DYSP पदावर पोलीस खात्यावर सेवेत आहेत ,विशाल महाडकर (मुंबई, movie डायरेक्टर ), अमरजी रेणुसे (HP पेट्रोल पंप मालक ) या सर्वांनी त्यांची मदत पाठविली.
पण या सर्व गोष्टी घडत असताना अमोल सरांची धडपड माझ्यापेक्षाही जोरात चालली होती.
आज रात्रीचे १२. ३० वाजले होते मी मस्त झोपलो होतो आणि दोन महानुभाव माझ्या घरी पोहचले ,अमोल सर आणि मिलिंद सर . त्यांच्या हातात टेलिस्कोप होता. खरं तर पहिल्यांदा शॉक च झालो. टेलिस्कोप देवून ते निघूनही गेले.
अमोल सर ,मिलिंद सर आणि टीम ...खरंच तुम्ही ग्रेट आहात . खूप काही शिकतोय तुमच्याकडून .
No comments:
Post a Comment