शिरीष जी आणि माझी ओळख फेसबुक वर च झाली . आणि तेव्हापासून ते आमच्या शाळेला खूप मदत करत आहेत . मागील वर्षी हि त्यांनी विद्यार्थ्यांना भरपूर शैक्षणिक साहित्य वाटप केले होते. त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती कि एखाद्या गरजू विद्यार्थिनीला शैक्षणिक बाबीसाठी दत्तक घ्यावे . आज तो योग्य आला. माझ्या वर्गात दीक्षा जगताप नावाची मुलगी आहे. हुशार चुणचुणीत दिक्षा ला शिरीष आणि त्यांच्या पत्नी शिक्षणासाठी मदत करणार आहेत. आणि त्याची सुरुवात त्यांनी याच महिन्यापासून केली आहे. दिक्षाला ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षणासाठी मदत करणार आहेत. दिक्षा खूप शिक , मोठी हो.आणि या प्रवासात जशी आपल्याला मदत झाली तशीच इतरांनाही मदत कर. खूप खूप धन्यवाद शिरीष जी आणि दर्शना मॅडम . https://www.rajnisir.in/2019/12/blog-post8Shirishji.html
No comments:
Post a Comment