Monday 7 March 2022

 


नक्षत्रवन ही संकल्पना भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. गेल्या काही वर्षांत वनसंपदेची अमर्याद तोड झाल्याने अनेक औषधी महत्त्व असणारी झाडे आता दुर्मिळ झाली आहेत. या झाडांना जगविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रत्येक गावाने नक्षत्रवन ही संकल्पना राबविणे आवश्‍यक आहे. या वनामुळे नागरिकांना दुर्मिळ झाडांची माहिती होईल. या झाडांची उत्तम जोपासना केल्यावरच ती चांगल्याप्रकारे जगतात. नक्षत्रवनामध्ये निवडलेली झाडे ही जास्तीत जास्त प्राणवायूचा पुरवठा करणारी आहेत. त्याचप्रमाणे औषधी गुणधर्म असणारीही आहेत, त्यामुळे प्रदूषणावर मात करणारी जैविक विविधतेचे संवर्धन वृक्षलागवडीच्या माध्यमातून होते.

प्रत्येक नक्षत्राचे एक झाड असते. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट नक्षत्रात जन्मलेली असते म्हणून त्या नक्षत्राचे झाड हे त्या व्यक्तीचा आराध्य वृक्ष समजला जातो. या समजाचा आधार घेऊन जनजागृती केल्यास निश्‍चितच या संकल्पनेला चालना मिळेल. या वनामध्ये प्रत्येक व्यक्तीने दर वर्षी एक झाड लावावे, त्याचे संगोपन करणे आवश्‍यक आहे.

विविध कारणांमुळे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळेच जागतिक पातळीवर तापमानवाढ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. वाढती जंगलतोड हे महत्त्वाचे कारण आहे. वृक्षलागवड, संवर्धन, जतन ही काळाची गरज झाली आहे. 


नक्षत्रवनातील महत्त्वाची झाड- ः


नक्षत्राचे नाव ---- वृक्ष

अश्‍विनी --- कालरा

भरणी -----आवळा

कृत्तिका------ उंबर

रोहिणी------ जांभूळ

मृगशीर्ष --------खैर

आर्द्रा ---------कृष्णागरू (पर्यायी वृक्ष ः बेहडा, चंदन)

पुनर्वसू------ कळक

पुष्य -------पिंपळ

आश्‍लेषा -----नागचाफा

मघा -----वड

पूर्वा फाल्गुनी------- पळस

उत्तरा फाल्गुनी ------ पायर

हस्त------ जाई

चित्रा ------बेल

स्वाती -----अर्जुन

विशाखा -----नागकेशर

अनुराधा ------नागकेशर

ज्येष्ठा -------सावर

मूळ ----------राळ

पूर्वाषाढा ------वेत

उत्तराषाढा ------फणस

श्रवण-------- रुई

धनिष्ठा--------- शमी

शततारका --------कळंब (पर्यायी वृक्ष - कदंब/निव)

पूर्वा भाद्रपदा ------आंबा

उत्तरा भाद्रपदा------- कडुनिंब

रेवती -----------------मोह



No comments:

Post a Comment

मदतीसाठी आवाहन

  मदतीसाठी आवाहन  शालेय जीवनापासूनच कलेला   अनन्यसाधारण महत्व आहे.   प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे ...