सह्याद्रीच्या कुशीत लपलेले चांदर गाव आणि त्याभोवतीचा परिसर म्हणजे निसर्गाने भरभरून देणगी दिलेले वरदान आहे . पण त्याच बरोबर , कष्ट, हाल, अंधार आणि अशा गोष्टी येथील लोकांच्या वाट्याला आल्या आहेत ; ज्या सामान्य माणसाला नको वाटतात. ज्या गोष्टी आपल्याला संकटे वाटतात त्या येथील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असे म्हणायला हरकत नाही. मागच्या महिन्यात संकल्प , अविनाश आणि त्याचा दक्षिण आफ्रिकेतील मित्र आरिमामी यांनी या चांदर आणि परिसरातील जीवनमान आणि अडचणी यांवर आधारित एक १५ मिनिटांची शॉर्ट मुव्ही तयार केली. या तरुण मुलांनी केलेला हा प्रयत्न नक्कीच बाहेरील जगाची या भागातील लोकांशी ओळख करण्यास मदत करेल.
संकल्प , अविनाश आणि आरिमामी तुम्ही फार कमी वेळात कष्टाने हे साध्य केले ,खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
या शॉर्ट मुव्हीचे स्क्रिनिंग २६ जानेवारी २०२२ ला चांदर गावात च होणार आहे. नक्की या.
No comments:
Post a Comment