Skip to main content

Posts

  मागील वर्षी सुरु केलेल्या तुरिया लॅब मुळे अतिशय चांगला बदल मुलांमध्ये दिसून येतोय. STEM वर आधारित या प्रयोगशाळेत आता मुलांना विविध कलात्मक गोष्टी सुद्धा करायला मिळत आहेत. तुररिया लॅब ही संकल्पना Ajay daa ने फार मनातून आणि तळमळीने सुरु केली आहे. अजय दा सध्या अमेरिकेत स्थायिक असून , ग्रामीण भागातील मुलांना विज्ञान अधिक कृतियुक्त पद्धतीने शिकता यावे यासाठी त्यांची धडपड आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये छोटीशी प्रयोगशाळा असावी या हेतूने त्यांनी 'तुरिया लॅब ' ही संकल्पना पुढे आणली आहे. मागील वर्षी माझ्या शाळेत सुरु केलेली प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी त्यांची आवडती जागा झालेली आहे. तुरिया लॅब आता इतर शाळांमध्येही सुरु करावी या हेतूने आज आमचे प्रयोगशील मित्र राहुल जी वाघमारे यांच्या जिल्हा परिषद शाळा निगडे मोसे येथे प्रयोगशाळेची स्थापना आज करण्यात आली. एकमेकांच्या सहकार्याने आपण अनेक गोष्टी आत्मसात करू शकतो आणि याचीच ही सुरूवात आहे, असे म्हणायला हरकत नाही.
Recent posts
  मागच्या आठवड्यात शाळाबाह्य असणाऱ्या काही विदयार्थ्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहात आणू शकलो. आदिवासी समाजातील ही मुले आणि त्यांचे कुटुंब मुख्य समाजधारेतून वेगळे आहेत. ही मुले शाळेत टिकावी यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. आमचे मित्र नरेंद्र सर, अमर सर आणि सचिन सर यांनी आज पुढाकार घेऊन या मुलांना अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत कुठलीही अडचण येऊ नये आणि यांचा शैक्षणिक प्रवास अविरत सुरु रहावा हीच अपेक्षा . Last week we were able to bring some of the out-of-school students in mainstream. These tribal children and their families are separated from the mainstream society. Efforts are currently underway to ensure that these children stay in school. Our friends Narendra sir, Amar sir and Sachin sir took the initiative today and gifted many kinds of educational materials to these children. It is hoped that there should not be any problem in their educational process and that their educational journey continues uninterrupted.
 
   Science Seminar at Turiya Lab
    आज रविवार ची सुट्टी मजेत गेली. मागील काही दिवसा आधी जयश्री ताई चा फोन आला .  त्यांनी आणि त्यांच्या संस्थेने सुरु केलेल्या Kinderuni या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी  शाळेतील मुलांना घेवून या असे त्या म्हणाल्या . जयश्री ताई या Goeth Institute Max Mueller Bhavan ,Pune BKD च्या प्रकल्प प्रमुख आहेत. Goeth Institute ही फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी ची जर्मन भाषा शिकविणारी प्रमुख संस्था आहे. इतर देशात जर्मन भाषा शिकण्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या संबंधी प्रोत्साहन देते. तिथे जाणे मुलांसाठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असेल हे माहित होते म्हणून मी पण होकार दिला .       आज प्रत्यक्ष तिथे गेल्यावर माझ्यापेक्षा मुलांना भन्नाट मज्जा आली. परत येतांना गाडीमध्ये मुलांची आजच्या कार्यशाळेबद्दल  चिवचिव ऐकूण आजचा दिवस सार्थकी ठरला यात शंका नाही. Kinderuni लहान मुलांना  त्यांच्या रोजच्या जीवनातील गोष्टींमधील विज्ञान रंजक पद्धतीने उलगडून दाखविते आणि त्यांची विज्ञानाची गोडी वाढविते. आणि सोबतच इतर भाषेतील काही नवीन शब्द शिकण्याची संधी देते.      जर्मन भाषेतील अनेक शब्द मुले शिकली. आणि त्यांची ती बडबड ऐकू
 
         समर कॅम्प म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना नवीन गोष्ट . उन्हाळ्याच्या सुट्टीत असे सेमिनार होतात हे फक्त काही मुलांना माहित असते एवढंच. माझ्या शाळेतील मुलानांही समर कॅम्प आणि त्या अंतर्गत होणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा अनुभव मिळावा या हेतूने या वर्षी पहिल्यांदाच माझ्या जिल्हा परिषद शाळेत समर कॅम्प चे आयोजन करण्याचे ठरविले . आराखडा तयार केला ,कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या , त्यासाठी काय काय साहित्य लागेल या आणि अशा अनेक गोष्टींची यादी तयार केली.क्राफ्टिंग,आकाशदर्शन,रोपवाटिका तयार करणे,विज्ञान कार्यशाळा,बॉलीवूड डान्स कार्यशाळा,कलाजत्रा ,डिझायनिंग ड्रेस workshop , मॉडेल डिझायनिंग workshop,वारली चित्रकला ,भाषिक खेळ,सापांविषयी माहिती,परदेशातील विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक देवाणघेवाण,मुंबई येथील नेहरू सेंटर येथे फिल्ड ट्रिप,अक्षर कार्यशाळा,आनंद मेळावा,लोकनृत्य कार्यशाळा,गोष्टींची शाळा या सर्व विषयांचा समावेश या समर कॅम्प मध्ये केला. सर्व ठरल्यावर या ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी लोकांची शोधाशोध सुरु झाली आणि काय भारी माणसे यावेळी भेटली . कुलकर्णी मॅडम,गौरव सर,अपर्णा ताई,भावना मॅडम ,अनुषा,तेजल,श्
  नक्षत्रवन  ही संकल्पना भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. गेल्या काही वर्षांत वनसंपदेची अमर्याद तोड झाल्याने अनेक औषधी महत्त्व असणारी झाडे आता दुर्मिळ झाली आहेत. या झाडांना जगविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रत्येक गावाने नक्षत्रवन ही संकल्पना राबविणे आवश्‍यक आहे. या वनामुळे नागरिकांना दुर्मिळ झाडांची माहिती होईल. या झाडांची उत्तम जोपासना केल्यावरच ती चांगल्याप्रकारे जगतात. नक्षत्रवनामध्ये निवडलेली झाडे ही जास्तीत जास्त प्राणवायूचा पुरवठा करणारी आहेत. त्याचप्रमाणे औषधी गुणधर्म असणारीही आहेत, त्यामुळे प्रदूषणावर मात करणारी जैविक विविधतेचे संवर्धन वृक्षलागवडीच्या माध्यमातून होते. प्रत्येक नक्षत्राचे एक झाड असते. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट नक्षत्रात जन्मलेली असते म्हणून त्या नक्षत्राचे झाड हे त्या व्यक्तीचा आराध्य वृक्ष समजला जातो. या समजाचा आधार घेऊन जनजागृती केल्यास निश्‍चितच या संकल्पनेला चालना मिळेल. या वनामध्ये प्रत्येक व्यक्तीने दर वर्षी एक झाड लावावे, त्याचे संगोपन करणे आवश्‍यक आहे. विविध कारणांमुळे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळेच जागतिक पात
  सह्याद्रीच्या  कुशीत लपलेले चांदर गाव आणि त्याभोवतीचा परिसर म्हणजे निसर्गाने भरभरून देणगी दिलेले वरदान आहे . पण त्याच बरोबर , कष्ट, हाल, अंधार आणि अशा गोष्टी येथील लोकांच्या वाट्याला आल्या आहेत ; ज्या सामान्य माणसाला नको वाटतात. ज्या गोष्टी आपल्याला संकटे वाटतात त्या येथील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असे म्हणायला हरकत नाही.  मागच्या महिन्यात संकल्प , अविनाश आणि त्याचा दक्षिण आफ्रिकेतील मित्र आरिमामी यांनी या चांदर आणि परिसरातील जीवनमान आणि   अडचणी  यांवर आधारित एक १५ मिनिटांची शॉर्ट मुव्ही तयार केली. या तरुण मुलांनी केलेला हा प्रयत्न नक्कीच बाहेरील जगाची या भागातील लोकांशी  ओळख करण्यास मदत करेल.  संकल्प , अविनाश आणि आरिमामी तुम्ही फार कमी वेळात कष्टाने हे साध्य केले ,खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.  या शॉर्ट मुव्हीचे स्क्रिनिंग २६ जानेवारी २०२२ ला चांदर गावात च होणार आहे. नक्की या.