व्यक्तिविशेष-
श्री. मिलिंद जी पगारे२०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा वेगळे जीवन जगणारे मिलिंद सर माझ्यासारख्या तरुण शिक्षकाला प्रेरणास्थान आहेत. आराम करण्याच्या या वयातही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक शाळांमध्ये ,संस्थांमध्ये प्लास्टिक निर्मूलन, देहदान,अवयवदान यांसारख्या अनेक विषयांवर मिलिंद जी मार्गदर्शन करतात आणि तेही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा करतात. २०१८ मध्ये ज्यावेळी मी या शाळेत रुजू झालो होतो त्यावेळी त्यांनी शाळेत एक वर्कशॉप घेतला होता त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी आमची पुन्हा शाळेत भेट झाली. मुलांनी तास भरात भरपूर गोष्टी शिकल्या ज्या त्यांच्यासाठी पुढे शिदोरी ठरणार आहे. दुसऱ्यांसाठी धडपणाऱ्या मिलिंद जी ना मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो.
No comments:
Post a Comment