आज रविवार ची सुट्टी मजेत गेली. मागील काही दिवसा आधी जयश्री ताई चा फोन आला . त्यांनी आणि त्यांच्या संस्थेने सुरु केलेल्या Kinderuni या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेतील मुलांना घेवून या असे त्या म्हणाल्या . जयश्री ताई या Goeth Institute Max Mueller Bhavan ,Pune BKD च्या प्रकल्प प्रमुख आहेत. Goeth Institute ही फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी ची जर्मन भाषा शिकविणारी प्रमुख संस्था आहे. इतर देशात जर्मन भाषा शिकण्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या संबंधी प्रोत्साहन देते. तिथे जाणे मुलांसाठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असेल हे माहित होते म्हणून मी पण होकार दिला .
आज प्रत्यक्ष तिथे गेल्यावर माझ्यापेक्षा मुलांना भन्नाट मज्जा आली. परत येतांना गाडीमध्ये मुलांची आजच्या कार्यशाळेबद्दल चिवचिव ऐकूण आजचा दिवस सार्थकी ठरला यात शंका नाही.
Kinderuni लहान मुलांना त्यांच्या रोजच्या जीवनातील गोष्टींमधील विज्ञान रंजक पद्धतीने उलगडून दाखविते आणि त्यांची विज्ञानाची गोडी वाढविते. आणि सोबतच इतर भाषेतील काही नवीन शब्द शिकण्याची संधी देते.
जर्मन भाषेतील अनेक शब्द मुले शिकली. आणि त्यांची ती बडबड ऐकून मला पण ते शब्द शिकता आले.मुलांना काहीतरी नवीन गोष्टी शिकता याव्यात त्यासाठी तिथे विज्ञान विषयावर सुद्धा ऐक सेशन होते. सुर्यऊर्जा आणि त्याचे फायदे ,यावर सखोल माहिती मुलांना मिळाली. गोष्टीच्या सेशन मध्ये तर मुलांना भारीच मज्जा आली. खेळतानी उत्साह मुलांच्या चेह-यावर खुलून देशात होता..
आज काहीतरी नवीन शिकता आले.
आणि हो सर्व मुलांच्या सुरक्षेसाठी , जेवणासाठी जी व्यवस्था केली ती तर अप्रतिम होती.
How to use kinderuni website-
No comments:
Post a Comment