खालिद हा काश्मीर मधील कुपवाडा येथे राहणारा तरुण . सद्या बी.ए. च्या द्वितीय वर्षाला शिकतोय. मध्यमवर्गीय कुटुंबातील हा तरुण त्या गावाच्या जवळपास राहणा-या गरीब कुटुंबातील मुलांना शिकविण्याचे काम करतो. म्हणजे एक प्रकारे फ्री ट्युशन . आमचे मित्र Prasad Pawar सर यांच्या मार्फत आमची ओळख झाली.
खालिद स्वतःच्या घरी च मुलांना शिकवितो. मुले लांबूनही त्याच्याकडे शिकवणीला येतात. तो सर्वाना मोफत ट्युशन देतो. तो हे जे उत्तम कार्य करतोय त्याला मदत म्हणून काही साहित्य त्याला मिळावे यासाठी मी नेहमीप्रमाणे आमचे मित्र Keki Unwalla सर यांच्याशी बोललो होतो. टॅब, व्हाईटबोर्ड, इत्यादी साहित्य आज त्याला मिळाले. "मुलांना मी आणखी चांगल्या प्रकारे शिकवू शकेल !" , हे सांगताना त्याचाही कंठ दाटून आला.
Thank you Keki sir , huge respect for you
Khalid is a young man living in Kupwada, Kashmir. He is currently pursuing a B.A. second year. This young man from a middle class family works to educate the children of a poor family living near the village. In a way, free tuition. We were introduced through our friend Prasad Sir.
Khalid teaches children in his own home. Children come to him from afar to teach. He gives free tuition to everyone.
No comments:
Post a Comment