Monday 6 July 2020

कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद आहेत आणि त्या कधी सुरु होतील हे सध्यातरी सांगता येणार नाही . कदाचित दोन महिने,सहा महिने किंवा वर्षभर हि त्यास लागू शकतो . पण या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात कमी करण्यासाठी ऑनलाइन शिक्षण याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही . खरे म्हणजे प्रत्यक्ष शाळा आणि शिक्षक यांची जागा तंत्रज्ञान घेवू शकत नाही पण सध्याच्या काळात तंत्रज्ञानाची मदत घेतल्याशिवाय आपण होणारे नुकसान कमी करू शकणार नाही . आम्ही सुद्धा आमच्या शाळेत Home Schooling model सुरु कारविण्याचे ठरविले होते . पण अनेक अडचणी समोर उभ्या होत्या . ग्रामीण भाग , हातमजुरी काम करणारे पालक त्यामुळे स्मार्ट फोन किंवा टॅबलेट घेणे त्यांना झेपणार नव्हते . पण प्रत्येक अडचण आपण एकमेकांच्या सहकार्याने दूर करू शकतो . Thinksharp Foundation आणि संतोष फड सर हे ग्रामीण भागातील शाळांत शहरी भागातील शाळांसारख्या सुविधा पुरविण्यासाठी अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत . आम्ही या संस्थेच्या सहकार्याने Home Schooling model साठी लागणाऱ्या साधनांसाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी campaign सुरु केला आणि आज आम्ही पहिला टप्पा पूर्ण केला . यासाठी अनेक लोकांनी आर्थिक मदत केली . विद्यानंदजी काळे साहेब ,सोनीया जी आणि मित्र तुम्हा सर्वांचे मनापासून आभार . पण , आणखी काही लोकांही कौतुकास पात्र आहेत . त्यामध्ये मुंबई मधील काही शाळकरी मुलानीही यात योगदान दिले.आज शाळेतील मुलांना टॅबलेट मिळाले ,चिमुकले आनंदी झाले . अजुनही भरपूर विद्यार्थी बाकी आहेत. आपणही या उपक्रमात मदत करू शकता .
टिप - विद्यार्थी ठरविक वेळ च या साधनांचा वापर करणार याची काळजी घेण्यात येणार आहे. वर्गात शिकविताना जसा धमाल -मज्जा येते तशी ऑनलाईन शिकविताना येणार नाही; पण विद्यार्थ्यांना कंटाळा येणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेणार आहोत . तुमच्या काही सूचना असतील तेही सांगावे
The corona virus infection has closed schools and it is not yet known when they will start. It may take two months, six months, or a year. But in this time, we have no choice but to have online education to reduce the educational loss of students to a certain extent. In fact, technology cannot replace physical schools and teachers, but we cannot reduce the damage that we have in the present day without the help of technology. We had also decided to start a home schooling model in our school. But there were many difficulties. Parents working in rural areas and hand-employed parents would not be able to afford a smart phone or tablet.
But we can solve every problem with each other. ThinkSharp Foundation and Santosh Phad Sir have been working for years to provide facilities like urban schools in rural schools. We started a campaign in collaboration with this organization to get financial support for the means required for the home schooling model and today we completed the first phase. Many people have been financially supported. Vidyanandji Kale Saheb, SoniyaJi and friends thank you all. But others are also worthy of praise. Among them were the children of the School in Mumbai.
Today, the children in the school got tablets and the little ones were happy.
Tip - Students will be careful to use these tools at the time of the decision. You can't teach online as you do in class; But we will take care not to get bored. Tell me if you have any suggestions.
Thank you
Santosh Phad
 
 

No comments:

Post a Comment

मदतीसाठी आवाहन

  मदतीसाठी आवाहन  शालेय जीवनापासूनच कलेला   अनन्यसाधारण महत्व आहे.   प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे ...