कालची गणराज्य दिनाची रात्र चांदर गावात..
निमित्त होते आमचे मित्र आणि अवचित ट्रेकिंग ग्रूप च्या वतीने या भागातील लोकांसाठी तयार केलेले मेडिकल किट चे वाटप..
मागच्या महिन्यात या गावातील एका महिलेला सर्पदंश झाला होता .दैव बलवत्तर म्हणून ती वाचली ,परंतु फार त्रास तिलासहन करावा लागला होता .याविषयी आम्ही मित्रमंडळी नी चर्चा केली होती ,की काही औषधोपचार लोकांसाठी करता येईल का आणि मग काही डॉक्टरांच्या सहकार्याने आम्ही एक मेडिकल किट तयार केली आणि या मेडिकल मध्ये सर्पदंश आणि इतरही काही आजारासाठी औषधी समाविष्ट करून ही किट या लोकांना वाटप करण्यात आली.
या भागातील लोकांसाठी नेहमीच समाजोपयोगी काम करणारे अवचित ट्रेकिंग ग्रुपमधील सदस्यांनी इतरही काही नित्योपयोगी वस्तू या ठिकाणी वाटल्या नक्कीच लोकांना त्याचा फायदा होईल.
#Join this campaign
No comments:
Post a Comment