Saturday, 24 December 2022

 मागील वर्षी सुरु केलेल्या तुरिया लॅब मुळे अतिशय चांगला बदल मुलांमध्ये दिसून येतोय. STEM वर आधारित या प्रयोगशाळेत आता मुलांना विविध कलात्मक गोष्टी सुद्धा करायला मिळत आहेत.

तुरिया लॅब ही संकल्पना Ajay daa ने फार मनातून आणि तळमळीने सुरु केली आहे. अजय दा सध्या अमेरिकेत स्थायिक असून , ग्रामीण भागातील मुलांना विज्ञान अधिक कृतियुक्त पद्धतीने शिकता यावे यासाठी त्यांची धडपड आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये छोटीशी प्रयोगशाळा असावी या हेतूने त्यांनी 'तुरिया लॅब ' ही संकल्पना पुढे आणली आहे.
मागील वर्षी माझ्या शाळेत सुरु केलेली प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी त्यांची आवडती जागा झालेली आहे.
तुरिया लॅब आता इतर शाळांमध्येही सुरु करावी या हेतूने आज आमचे प्रयोगशील मित्र राहुल जी वाघमारे यांच्या जिल्हा परिषद शाळा निगडे मोसे येथे प्रयोगशाळेची स्थापना आज करण्यात आली. एकमेकांच्या सहकार्याने आपण अनेक गोष्टी आत्मसात करू शकतो आणि याचीच ही सुरूवात आहे, असे म्हणायला हरकत नाही.






No comments:

Post a Comment

  Project- कणाद :  Science Exibition Platform कणाद हा तुरिय लॅबचा प्रमुख प्रकल्प आहे, जो मुलांमध्ये सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्य...