Chandar Talkies
२६ जानेवारी आज चांदर ला मुक्काम . दरवेळी या गावातील मुलांना काहीतरी नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न असतो.
सुट्टी च्या दिवशी टाॅकीज मध्ये जावुन एखादा सिनेमा आपल्या मुलांना दाखविणे ही शहरी भागातील पालकांना काही नवीन गोष्ट नाही.
पण सर्व च पालकांना हे शक्य नसते. पुणे शहर या चांदर गावापासुन १०० किमी लांब, दळणवळणाच्या सोयींचा अभाव यामुळे सिनेमा, मुव्ही, अशा गोष्टी त्यांच्या फार च लांब .
आज मुलांना एक वेगळा अनुभव आला. मोठ्या स्क्रीन वर असा मोठा सिंह बघुन पोरं खदखदुन हसली. भारी वाटलं.
#Lion king...
No comments:
Post a Comment