Friday, 29 January 2021

 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭- 𝐇²𝐎

(𝐏𝐡𝐚𝐬𝐞-2)
काही दिवसांआधी आम्ही चांदर गावातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न यशस्वीही झाला. चांदर गावाच्या जवळपास आणखीही अनेक वाड्यावस्त्या आहेत आणि त्यांचीही हीच समस्या आहे. आम्हाला जेवढे आणि जिथे शक्य होईल तिथे आम्ही मदत करण्यास प्रयत्न करणार आहोत.
कालचा गणराज्य दिन टाकीवस्ती या गावासाठी महत्वाचा ठरला . पाणी दारात आलं.
Thank You Irfan Foundation &
Keki Unwalla
sir for helping to make it possible.
A few days ago we tried to solve the water problem in Chander village and that attempt was successful. There are many more villages near Chander village and they have the same problem. We will try to help as much as we can and wherever possible. Chandar Talkies

६ जानेवारी आज चांदर ला मुक्काम . दरवेळी या गावातील मुलांना काहीतरी नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न असतो.
सुट्टी च्या दिवशी टाॅकीज मध्ये जावुन एखादा सिनेमा आपल्या मुलांना दाखविणे ही शहरी भागातील पालकांना काही नवीन गोष्ट नाही.
पण सर्व च पालकांना हे शक्य नसते. पुणे शहर या चांदर गावापासुन १०० किमी लांब, दळणवळणाच्या सोयींचा अभाव यामुळे सिनेमा, मुव्ही, अशा गोष्टी त्यांच्या फार च लांब .
आज मुलांना एक वेगळा अनुभव आला. मोठ्या स्क्रीन वर असा मोठा सिंह बघुन पोरं खदखदुन हसली. भारी वाटलं.
#Lion king...


 #Republic Day

Computer मित्रा...
We have started a project in the school ‘Computer मित्रा ..’ This programme will help kids to educates in computer basics.
Thank you
ThinkSharp Foundation
&
Santosh Phad
sir for your great efforts.


Friday, 8 January 2021

 चांदर गावातील महिलांचे पाण्यासाठीचे हाल मी फार जवळून पाहिले आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी ४०-४५ मिनिटे केलेली पायपीट मी स्वतः डोळ्यांनी अनुभवलेली आहे. सध्या गावात विहीर झालेली आहे पण तीही २०० ते ३०० मीटर अंतरावर त्यामुळे अजूनही पाण्यासाठीचा त्रास हवा तसा कमी झालेला नाही. ३ वर्षांपूर्वी STP च्या मदतीने आम्ही विहिरीचे पाणी सोलर मोटर द्वारे शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यशस्वीही झाला होता . पण काही दिवसांपूर्वी मोटार बंद पडली आणि जवळ आलेलं पाणी पुन्हा लांब गेलं .

आता गावात इलेक्ट्रिसिटी आली आहे.
Keki
जी आणि माझी नेहमीच सामाजिक विषयांवर चर्चा होत असतात. मी दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी या विषयावर बोललो. चांदर गावातील विहिरीवर नवीन मोटार बसविल्यास लोकांचा त्रास फार कमी होईल हे त्यांना समजलं . Irfan foundation आणि Keki ji यांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आणि आज गावातील पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला.
या गावात असं नळातून पाणी येणं .. आणि ते डोळ्यांनी पाहणे या पेक्षा मोठा आनंद नाही. भारी वाटतंय ...
🙏A big Thank you Keki sir🙏
I have closely watched the plight of the women of Chander village for water. I have personally experienced 40-45 minutes of piping for a pot of water. Currently, there is a well in the village but it is also at a distance of 200 to 300 meters, so the problem of water has not been reduced as it should be. 3 years ago with the help of STP we tried to bring the well water to the school by solar motor and it was successful. But a few days ago, the system stopped and the oncoming water receded.
Now there is electricity in the village.
Keki and I are always discussing social issues. I spoke to him about this two days ago. He understood that if a new motor was installed on the well in Chander village, the trouble of the people would be lessened. He took the initiative for financial help and today the water supply in the village was resumed.
In this village, getting water from such a tap .. and seeing it with the naked eye is a greater joy. Feeling Happy ...
A Big big thank you Keki sir.. & Irfan foundation 🙏 सावित्रीमाय...#misavitri
 #National Education Day..
Today interacted with the kids from Vietnam. Feeling happy knowing that coming generations have respect and love to each other.
#राष्ट्रीय शिक्षा दिवस
आज वियतनाम के बच्चों के साथ बातचीत की। यह जानकर खुशी महसूस होती है कि आने वाली पीढ़ियों को एक-दूसरे के प्रति सम्मान और प्यार है।

  व्यक्तिविशेष-  श्री. मिलिंद जी पगारे  २०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा...