कोरोना ....कामगारांचे स्थलांतर .. आणि हातावर पोट असलेल्यांचे झालेले हाल .. या सर्व गोष्टी न्यूज चैनल वर आपण पाहिलेल्या आहेत. पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती आज जवळुन पाहिली.
प्रभु.. कर्नाटक मधून मुंबई त पोट भरायला गेलेला तरुण. भाड्याचा ऑटो चालवून सर्व नीट सुरु असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि इतर कामगारांप्रमाणे त्याचेही हाल सुरु झाले. मागील महिन्यात तो पुण्यात आला. सध्या माझी शाळा असलेल्या गावातच तो राहतोय. दोन दिवसांआधी कामाच्या शोधात तो शाळेत आला... "सर ,काही काम असेल तर सांगा .." हे ऐकुन मी पण त्याची विचारपूस केली तेव्हा त्याची सर्व हकीकत समजली.
सद्ध्या आमच्या शाळेत मैदान सुशोभीकरणाचे काम सुरु आहे . शाळेच्या बाहेर असलेली माती त्याने अतिशय कष्टाने मैदानात आणून दिली. खिशातून ५०० रुपयाची नोट त्याला देताना जो आनंद झाला तो भारीच ...
No comments:
Post a Comment