Monday, 23 September 2019


✌️With google lens✌️
EVS
‘आपल्या अवती भवती

गुगलने नव्याने लाॕन्च केलेल्या गुगल लेन्स या अप्लिकेशन चा वापर रोजच्या अध्यापनात करून ज्या गोष्टी ,ज्या वस्तू आपणास रोज दिसतात, परंतु त्यांची नावे तसेच त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहीती नसते अश्या प्राणी ,वनस्पती, वस्तू जे सर्व काही गुगल वर उपलब्ध आहे असे सर्व, त्याची माहिती तुम्ही गुगल लेन्सद्वारे घेऊ शकता. या अप्लिकेशन चा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध वनस्पती ,प्राणी, कीटक, फुले यांची माहिती गोळा केली आहे. परिसरात फेरफटका मारुन विद्यार्थ्यांनी सापाच्या कातीवरुन साप कोणत्या जातीचा..त्याचे नाव काय ? तसेच भुईमुगाचे शास्त्रीय नाव काय ?त्याचा कोणता उपयोग होतो आशी माहीती मिळवली.किमान आपला परिसर तरी आपल्याला संपूर्ण माहीत असणे गरजेचे आहे, आणि गुगलने हा प्रश्न सोडविला आहे त्याचे साधे उदाहरण म्हणजे आपल्या परिसरात विविध प्रकारचे गवत आढळते तरी त्याचे खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रत्येक गवताला कोणते नाव आहे?त्याचे शास्त्रीय नाव काय?कोणते गवत आपली गुरे खातात? कोणते खात नाहीत? असे वेगवेगळे प्रश्न मुलांना पडतात.मग ग्रामीण भागात सर्रास उगवणारे काँग्रेस गवत त्याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात? त्याचा उपयोग काय? याची माहिती मुलांना नसते. परंतु या याअँपद्वारे विद्यार्थ्यांनी सर्व माहिती मिळवली आहे. मुळातच मुले चिकित्सक असतात ,त्यांना खुप प्रश्न नेहमी पडतात.काही उत्तरे शिक्षकांना आणि पालकांनाही माहीत नसतात त्यासाठी आपण या अॕप चा वापर करु शकतो. आवश्यकता असते फक्त त्यांची उत्सुकता जागवण्याची आणि ज्या वेळेस गूगल लेन्सचा वापर आम्ही केला ...तेव्हा पासून मुले स्वतःहून फोटो काढतात. व त्याची माहिती मिळतात या झाडाचे नाव काय? या प्राण्याला काय म्हणतात? हा कोणता कीटक आहे? ही कोणत्या सापाची कात आहे? असे एक ना विविध प्रश्न त्यांना पडू लागले आहेत आणि हे प्रश्न पडणे म्हणजेच ज्ञान मिळविण्याची पहिली पायरी आहे. या लेन्स या लेन्सचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनातही खूप करू शकतो याद्वारे आपण एखाद्या पुस्तकातील टेक्स्ट कॉपी करून त्याची माहिती आपण गुगलवरुन घेऊ शकतो तसेच कोणतेही पुस्तक अथवा मीडिया आपण सहज सर्च करू शकतो तसेच क्यूआर कोड बारकोड स्कॅन करता येतो... आता याचा वापर करताना प्रथम गुगल स्टोअर वर जाऊन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे, इन्स्टॉल केल्यानंतर कोणत्या वस्तूंची माहिती आपल्याला हवी आहे त्या वस्तूवर कॅमेरा ठेवल्यास काही डॉट येतात ,त्या डॉटवर क्लिक करुन त्याचा फोटो निघतो व तो फोटो गुगल वर सर्च होतो.व आपल्याला हवी ती माहिती आपल्याला मिळते ही उपलब्धता आपल्यासाठी खूप मोठी आहे त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात एक करू शकतो म्हणून या अॕपचा वापर सर्व शाळांनी करून जास्तीत जास्त अज्ञात प्राणी वनस्पती वस्तूंची माहिती आपल्याला मुलांना द्यायला हवी.


Wednesday, 11 September 2019


"Happy  Birth Day Gouri"

गौरी... माझ्या वर्गातील चुनचुनित ,लाजरी ,हुशार , प्रामाणिक ,कष्टाळू मुलगी . मागील एक वर्षापासून गौरी माझ्या वर्गात आहे. ती हुशार आहे पण तितकीच कष्टाळू. क्वचितच तिने गृहपाठ केला नाही असे घडले असेल. ती शिकून खुप मोठी होईल यात शंकाच नाही. तिच्या वाढदिवसानिमित्त  तिला मनापासून शुभेच्छा.  







Thursday, 5 September 2019

"They guide you

They support you
They inspire you
They teach you.."



Today is the day to thank them..
Wishing you all A Happy Teachers Day...



  व्यक्तिविशेष-  श्री. मिलिंद जी पगारे  २०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा...